नुसतेच झाडे लावू लावू नका ; संरक्षण आणि संगोपन करा कुलगुरु डॉ. विश्वनाथा यांचे आवाहन
राहुरी तालुका प्रतिनिधी -
महात्मा फुले कृषि विद्यापीठात प्रवेश घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाच झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. झाडांपासून निर्माण होणारा काडी, कचरा आणि पाला पाचोळा जाळल्यामुळे कार्बन डायऑक्सईड निर्माण होऊन वातावरणाचे प्रदूषण होऊन तापमानात वाढ होते. मात्र याच पालापाचोळ्याचे खत केले तर जमिनीतील कर्ब वाढून जमिनीची उत्पादकता वाढेल. त्यामुळे या वनमहोत्सवाच्या निमित्ताने आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी नुसतेच झाडे लावू नका. तर ते जगवा आणि त्यांचे संरक्षण करा, असे आवाहन कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात वनमहोत्सव आणि कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, विभागीय वनअधिकारी श्रीमती किर्ती जमधाडे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, नगर जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पंडित लोणारे, राहुरी तहसीलदार अनिल दौंडे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपवनक्षेत्रपाल आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी श्रीमती किर्ती जमधाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी केले. वनमहोत्सवाची माहिती संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी केले. डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.