राहता येथे सोमवार ठरला ‘अपघात’वार!
राहाता प्रतिनिधी
नगर-मनमाड महामार्गावर हायवेवर तीन वेगवेगळे अपघात झाले. त्यामध्ये पहिल्या अपघातात साकुरी हद्दीमध्ये झालेल्या अपघातात लहानूबाई ज्ञानेश्वर पवार या महिलेचा मृत्यू झाला. तर दुसया अपघातात एस. टी. बस चालकाने मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात एस. टी. बस रस्त्याच्या उजव्या बाजूला नेल्याने शिर्डीकडे जाणारी स्विफ्ट कारला एसटीची धडक बसली. अतीवेगाने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या पानटपरीवर जाऊन आदळली. तिसया राहाता कोर्टासमोर झालेल्या अपघातात इको स्पोर्टस वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने ते वाहन जागेवर पलटी झाले.
अपघातग्रस्त बसमध्ये ६५ प्रवासी होते. सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. पानटपरी चालक तरुणाला जोराची धडक दिल्याने तो मात्र गंभीर जखमी झाला. तर त्यामध्ये असलेल्या जोडप्याला किरकोळ स्वरुपाची इजा झाली. पानटपरीला एस. टी. बसने जोराची धडक दिल्याने ती टपरी २० ते २५ फूट अंतरापर्यंत बसने फरफटत नेली. टपरीमधील ऋषिकेश अहिरे या तरुणाला बसचा जोराचा मार लागला. त्याला तात्काळ शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांनतर ती अपघातग्रस्त बस रस्त्याच्या उजव्या बाजूला गेली. समोरुन येणाया स्विफ्ट डिझायर कारला {क्र. एम. एच. १७ बी.व्ही. ५२०७ } ती धडकली. या कारमधील एअर बॅग ओपन झाली. स्विफ्ट चालक ढेसले यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. या जोराच्या धडकेमध्ये स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले. दुचाकीस्वाराच्या चुकीकीमुळे हा अपघात घडला. या मयत झाल्या असुन ज्ञानेश्वर पवार यांना मेंदूला मार लागल्याने त्यांना साईबाबा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आयशर कंपनीचा हा टॅम्पो इंदोर येथे चालला होता. अशा प्रकारे शहरात आज तीन वेगवेगळे अपघात घडले.
चौकट
शहरातील शिवाजी चौकात सिग्नल आणि गतिरोधक नाहीत. त्यामुळे याठिकाणी नेहमी अपघात होतात. यात आतापर्यंत अनेक जणांचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या असतात. अवैध प्रवासी वाहतूक तेजीत आहे. ही येथील अपघात्यांची कारणे आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक पोलीस आणि सिग्नलची व्यवस्था तात्काळ करावी.
किरण वाबळे, नागरिक, राहाता