बहिरवाडीत वृक्षारोपन
मेहेंदूरी / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील बहिरवाडी गावात युवा संघर्ष बहिरवाडी ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. बहिरवाडी गावात महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड शोधूनही सापडत नसल्याने, ही बाब गावातील तरुणांनी व ग्रुपमधील सदस्यांनी लक्ष्यात घेत, वडाच्या झाडाला प्राधान्य देवून गावात 250 वडाचे व 10 पिंपळाचे असे एकूण 260 झाडे लावण्याचा निर्धार करून, झाडे लावली व एक आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड संकल्पनेला साथ देत या ग्रुपने 260 झाडांचे वृक्ष रोपण केले. बहिरवाडीच्या सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी दुसर्या गावी जाऊन वडाची पूजा अर्चा करावी लागते. गावात वडाचे झाड नसल्याने महिलांनादेखील या गोष्टीला सामोरे जावे लागते. त्यामुळे युवा संघर्ष बहिरवाडी ग्रुपने स्वतः 260 झाडे खरेदी केली. गावातील महत्वाच्या ठिकाणी वृक्षारोपन केले. वृक्ष मानवी जीवनातील एक महत्वाचा भाग आहे, परंतु मानवाने बेसुमार वृक्ष तोडल्यामुळे निसर्गाचा असमतोल बिघडत असल्याचे चित्र प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवून, एक तरी वृक्ष लावावे. असा संदेश युवा संघर्ष बहिरवाडी ग्रुपने दिला यावेळी वृक्ष रोपणासाठी ऋतिक चासकर, प्रतीक वावळे, ओंकार चासकर, अनिकेत पाडेकर, मनोज वावळे, संदेश वावळे, सुनिल चासकर आदींनी वृक्षरोपण केले.
