Breaking News

श्रीगोेंदा कारखाना येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप


श्रीगोंदा
श्रीगोंदा कारखाना येथील इंदिरा गांधी विद्या निकेतनमध्ये अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या 11 विद्यालयीन गरजू विद्यार्थ्यांना हनुमान मित्र मंडळामार्फत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. यावेळी मुख्याध्यापक डी.एस पाटील, गणेश शेजवळ, सुशांत राऊत, दीपक दांडगे, रामभाऊ काळदाते, चांगदेव उंडे, मुन्ना घोडेकर यांचेसह विद्यालयीन विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.