‘एक देश, एक निवडणूक’ला रजनीकांतचे समर्थन
चेन्नई - ‘एक देश, एक निवडणूक’साठी मोदी सरकारच्या मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. दाक्षिणात्या चित्रपटातील सुपरस्टार व अभिनेता ते राजकीय नेते बनलेल्या रनजीकांत यांनी मोदी सरकारच्य ’वन नेशन, वन इलेक्शन’ मोहिमेचे समर्थन केले आहे. रजनीकांतने ’एक देश, एक निवडणूक’ चे समर्थन करताना म्हटले आहे, की यामुळे पैसे व वेळेची बचत होईल. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान रजनीकांत यांनी म्हटले, की ’एक देश, एक निवडणूक’ संकल्पना खूपच चांगली आहे. यामुळे पैसे व वेळेची बचत होईल. या मोहिमेला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त करून सहयोग करणे आवश्यक आहे. याबरोबरच रजनीकांत यांनी म्हटले, की अन्य राज्यांच्या तुलनेत तामिळनाडू राज्याची एज्युकेशन सिस्टम खुपच चांगली आहे. ’एक देश, एक निवडणूक’साठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. मोदी सरकार व खुद्द पीएम मोदींचीही अशी इच्छा आहे, की देशात विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी अनेक पक्षांना केले आहे.