Breaking News

शेतमालाचा हमीभाव वाढला पण, द्यायचा कोणी ?

मुंबई - केंद्र सरकारने शेतीमालाच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. मागील 20 वर्षाच्या काळात सर्वात मोठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मं त्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये खरीप हंगामासाठी हमीभावामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात धान्याला 250 रूपये प्रति क्विंटल एवढा भाववाढ केली आहे. खरीपातील एकूण 14 पिकांचे हमीभाव वाढविण्यात आले आहेत. सरकारने ज्वारीला देखील 730 रूपये हमीभाव वाढवला आहे.

केंद्र सरकारने हमीभाव वाढवले असले वाढीव भाव नेमका द्यायचा कोणी हाही मोठा प्रश्‍न आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले आहेत. मात्र, सरकार हमीभावाने खरेदी करत नाही आणि बाजारातील व्यापारी शेतकर्‍यांनी हमीभाव देत नाही, अशा परिस्थितीमध्ये हमीभाव वाढून काहीही फायदा होणार नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हमीभावाने खरेदी करणारी सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर आणि सक्षमपणे उभी राहण्याची गरज असल्याचे मत शेती क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.