Breaking News

कर्नाटकात 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची अर्थसंकल्पात घोषणा

बंगळुरू : कर्नाटकाच्या सत्तास्थापनेनंतर पहिला अर्थसंकल्प गुरूवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधीमंडळात मांडला. पहिल्याच अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे शेतकरी क र्जमाफीची घोषणा करण्यात आली. राज्यातील शेतकर्‍यांचे 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रूपयांची तरतूद क रण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्याच्याआर्थिक स्थिती स्पष्ट करणारी श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थसंक ल्प अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ट्विट केले होते. कर्नाटकातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणार असल्याचे संकेत गांधी यांनी दिले होते.
या अर्थसंकल्पात बेळगावात नवीन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल इखचड येथे उभारण्यात येणार आहे. कृष्णा नदी भागात सिंचन योजनेसाठी 100 कोटी रुपये खर्च करून चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी, नागरला, नेझ इत्यादी भागात सुमारे 10,225 हेक्टेर जमिनीत सिंचन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या यापूर्वी पार पडलेल्या बैठकीत राज्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंत शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकार 300 रुपये गणवेश खरेदीसाठी देणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण  विभागाने 115 कोटी 80 लाख रुपये मंजूर केले आहेत. सत्तासंघर्षातील रणकंदनानंतर होत असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा -
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बायोमेट्रीक हजेरी
मद्यावरील करात 4 टक्क्यांनी वाढ
बंगळुरूत 6 ठिकाणी उभारणार कॉरीडॉर
रामनगरामध्ये उभारणार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल