Breaking News

वारी ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण उत्साहात


कोपरगाव श. प्रतिनिधी :

तालुक्यातील पूर्व भागातील वारी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मासिक सभा झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन विविध विकास कामावर चर्चा केली.

सध्या गावातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे सुरु आहेत. या सर्व कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पुढील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे, असे या बैठकीत ठरले. संपूर्ण गावाच्या परिसरात जवळपास २ हजार ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा निर्धार सर्वच सदस्यांनी व्यक्त केला. जी झाडे टिकतील आणि वाढतील, अशाच प्रकारच्या झाडांची लागवड केली जाईल. जेणेकरून वृक्षारोपण हे मोहिमेसारखी होईल आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असेही यावेळी सर्वानुमते ठरले आहे. 

यावेळी सरपंच सतीश कानडे, उपसरपंच मनीषा गोर्डे, ग्रा. प. सदस्य गोकुळ कानडे, महेंद्र बागुल, संजय जाधव, विजय गायकवाड, राहुल टेके, नंदा निळे, रोहिणी निळे, सुवर्णा गजभिव, अनिता संत, वनिता चव्हाण, शिवाजी बाचकर, प्रशांत बरबडे, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, पोपट बनकर आदी उपस्थित होते.