भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा दुध आंदोलनास पाठिंबा
दुधाला किमान 27 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 16 जुलैपासुन दुध आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटना या आंदोलनास पाठिंबा जाहीर करत आहे. दुध ऊत्पादकांच्या रास्त मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व संघर्ष समिती गेली सहा महिने सातत्याने संघर्ष करत आहे. लुटता कशाला फुकटच न्या म्हणत, लाखगंगा येथुन सुरू झालेल्या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेनी वेगवेगळ्या प्रकारे या प्रश्नावर सातत्याने आंदोलन केले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सरकारने तीन वेळा शासनादेश काढले. दोन वेळा अर्थ सहाय्याच्या घोषणाही केल्या. मात्र प्रत्येक वेळी दुध ऊत्पादकांना मदत करण्याऐवजी सरकारने दुध पावडर बनविणार्या कंपन्यांनाच केवळ मदत केली. दुध ऊत्पादक शेतकर्यांना वार्यावर सोडले. सरकारने सुरवातीला पावडर बनविण्यासाठी दुध कंपन्याना प्रतिलिटर 3 रूपये अनुदान घोषित केले. एक महिण्यासाठी दिलेल्या या अर्थसहाय्याचा दुध दरावर कुठलाही सकारात्मक परिणाम झाला नाही. आता दुध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो 50 रूपये व दुध निर्यातिसाठी प्रती लीटर 5 रूपये अनुदान जाहीर केले आहे. आंतराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर व उपलब्धता पाहाता या पॅकेजचाही ऊपयोग होण्याच्या सुतराम शक्यता नाहीत. सरकारने गायीच्या दुधाला किमान 27 रूपये भाव जाहीर केला आहे. दुध ऊत्पादकांना मात्र आज प्रतिलिटर दुधाला 17 रूपये दर मिळतो आहे. लिटर मागे रोज 10 रूपयाचा तोटा शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमिवर जाहीर भाव व प्रत्यक्ष मिळत असलेले भाव यातील, फरक भावांतर योजनेअंतर्गत सरकारने शेतकर्यांंना सरळ अनुदान देवून भरून द्यावा, अशी मागणीही भूमिपुत्र शेतकरी संघटना करत आहे. या पार्श्वभूमिवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासुन राज्यात दुध आंदोलनाची घोषणा केली आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटना या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करत असल्याचे प्रसिद्धिपत्रक संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी जाहीर केले आहे.