Breaking News

संत निवृत्ती महाराज दिंडीतील वारकर्‍यांची आरोग्य तपासणी

श्री क्षेत्र त्रिंबकेश्‍वर येथील श्री संत निवृत्ती महाराज यांची दिंडी श्री संत गोदड महाराज यांच्या पावनभूमीत मुक्कामी आली असता, 108 अ‍ॅम्बुलन्स यांच्यावतीने वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पोलीस गुप्तवार्ता विभागाचे मनोज लातुरकर यांच्या हस्ते करण्यात आले तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व दै. लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे होते. यावेळी 108 रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे, संजय थोरात, डॉ. जयमाला बलदोटा, डॉ. उदय बलदोटा आदी उपस्थित होते.

श्री निवृत्तीनाथ महाराजाच्या दिंडीतील वारकर्‍यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बिव्हिजिच्या वतीने 108 अम्ब्युलन्स उभा करत तपासणी करून औषधे देण्यात आली.
कर्जत येथे माऊलींचे ज्येष्ठबंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. या दिंडीत सहभागी झालेल्या वारकर्‍यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी 108 उभी करून, यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय बलदोटा व डॉ. जयमाला बलदोटा यांनी तपासणी करून औषधोपचार केले, यावेळी आशिष बोरा, श्रीकांत तोरडमल, राम ढेरे, डॉ. राजेंद्र खेत्रे, डॉ. कांचन खेत्रे, रामेश्‍वर शर्मा, कपिल यादव, जालिंदर राऊत, सिस्टर संगीता चिकटे, संध्या तरवडे, हर्षदा गांगर्डे, महेश हजारे, योगेश गोसावी, नितीन देशमुख आदींसह अनेक वारकरी उपस्थित होते.


चौकट- 
108 च्या जिल्हा समनव्यक कांचन बिडवे यांच्या संकल्पनेतुन ही सेवा पुरविण्यात आली. यावेळी उपस्थित महिला व पुरुष वारकरी भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन, त्यांना औषधे देण्यात आली.रुग्णसेवा ही ईश्‍वरसेवाच असल्याने या उपक्रमाचे नागरिकांनी 108 ने राबविलेल्या या तपासणी शिबिराबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
दिंडीत जाणार्‍या भाविकांना उत्साह वाटावा तसेच, त्यांना वेळीच तपासणीद्वारे औषधोपचार मिळाला तर, आरोग्य ही चांगले राहील म्हणून, हे आरोग्य तपासणी उपचार शिबिर राबविण्यात आले असल्याचे डॉ. जयमाला बलदोटा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी 108 रुग्णवाहिकेचे कपील यादव यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी असंख्य वारकर्‍यांनी आपली तपासणी करून घेवून औषधोपचार करून घेतले.