Breaking News

शुभम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण

13 कोटी वृक्ष एकच लक्ष हा शासनाचा वृक्षरोपण व संवर्धन कार्यक्रम सर्वत्र राबविला जात आहे. पर्यावरण संवर्धन करणे आपले सर्वांचे ध्येय आहे, हे समजून पारनेर शहरातील क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी शुभम अकॅडमीकडुन शहरात क्रीडाप्रेमींनी हजारो वृक्षांचे रोपण केले. याप्रसंगी शुभम उद्योग समूहाचे प्रमुख ऋषिकेश औटी आणि शुभम स्पोर्टस् अकॅडमीचे प्रमुख सुमित औटी यांनी सांगितले की, खेळाबरोबर पर्यावरण रक्षण करणेही आपले प्रथम कर्तव्य आहे. यावेळी विशाल चेडे, राजेश शिंदे, ज्ञानेश्‍वर ठाणगे, संकेत हारदे, कुणाल आल्हाट, अक्षय नरवडे, वैभव जगदाळे, दीपक नरवडे, प्रशांत गायकवाड़ त्याचप्रमाणे सर्व खेळाडू उपस्थित होते. अकॅडमीच्या खेळाडूंनी वृक्ष लागवडीबरोबरच लागवड केलेल्या झाडांना कम्पाउंड करण्यात आले. या उपक्रमाचे अनेक स्तरातून शुभम स्पोर्टस् अकॅडमीचे आणि खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.