तरडगव्हाण सेवा संस्था अध्यक्षपदी डोके
श्रीगोंदा
तरडगव्हाण (श्रीगोंदा) सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी हनुमान अर्जून डोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे मावळते अध्यक्ष राजेंद्र बेरड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. बी. वाघमोडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी नवनियूक्त अध्यक्ष डोके म्हणाले की, गावामध्ये सभासदांसह शेतकर्यांना खताचे योग्य वाटप करण्यासाठी संस्था पुढाकार घेणार आहे. सर्वांना बरोबर घेवूनच आगामी काळामध्ये उत्तम कार्य करून संस्थेस नावलौकिक मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगिेतले.
