Breaking News

टाकळी ढोकेश्‍वर येथे पाच दुकानांमध्ये चोरी


टाकळी ढोकेश्‍वर : येथील बसस्थानक परिसरामधील पाच दुकांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दुकानांमधील लॅपटॉप, कपडे, साड्या, चप्पल चोरून नेल्या. ठुबे इमारतीतील चार आणि त्याच परिसरातील एका चप्पल दुकानामध्ये चोरी करण्यात आली. यामधील प्रशांत धरम यांच्या मालकीचे दुकान दुसर्‍यांदा फोडण्यात आले. या दुकानामधून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान दुकानात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये चौघेजण चोर कैद झाले आहेत, मात्र त्यांच्या चेहर्‍यावर रूमाल बांधलेला असल्याने त्यांची ओळख पटविणे काहीसे कठिण जात आहे. पारनेरचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर अहमदनगर येथील श्‍वानपथकासह ठसेतज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. श्‍वान पथकाने बसस्थानकापर्यंत मार्ग दाखविला.