Breaking News

वाहनाच्या धडकेत एकजण ठार


पारनेर :
नगर-पुणे मार्गावरील पळवे परिसरामध्ये मठवस्तीजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पोपट गंगराम शेळके (वय 50 वर्षे) जागीच ठार झाले. मंगळवारी रात्री 8 च्या दरम्यान पोपट शेळके आणि त्यांचे मित्र पायी आपल्या घरी महामार्गावरून जातेगाव फाट्याकडे जात असताना, ते रस्ता ओलांडत असताना त्यांचे पाठीमागून येणार्‍या वाहणाने जोराची धडक दिल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सुपा पालिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.