Breaking News

पुणे जिल्ह्यात १ लाख ४ हजार ४०० रोपांची लागवड


पुणे : वृक्ष लागवड वन महोत्सवाच्या कालच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यात एकंदर १ लाख ४ हजार ४०० रोपांची लागवड करण्यात आली . जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ५५ लाख ९१ हजार असून आगामी महिन्याभरात ते पूर्ण करायचे आहे . जिल्ह्यातील खेड विभागात सर्वाधिक म्हणजे २१ हजार ५०० रोपांची लागवड केली गेली तर हवेली विभागात सर्वात कमी म्हणजे २ हजार१०० रोपे लावण्यात आल्याचं वन विभागाने कळवले आहे. भोर विभागात २० हजार ,मुळशी १३ हजार ९१५ ,मावळ १४ हजार ३०० ,आंबेगाव ९ हजार ५०० ,जुन्नर १२ हजार ९३५ , तर पुरंदर विभागात १० हजार ५०० रोपे लावण्यात आली . या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला .