मनपा माध्यमिक विद्यालयात 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप
अहमदनगर । प्रतिनिधी । 01- येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिकचे मुख्याध्यापक घिगे, वरिष्ठ शिक्षिका श्रीमती घोलप व विशेष शिक्षक शिंदे, बानकर, साबळे व मनपा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पवार व कबाडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.
दुसंग यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्रीमती सोनवणे मॅडम, तांबे मॅडम व चिकने, पठाण यांनी मार्गदर्शन करुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक यांना रेल्वेस्टेशन परिसरातील विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेली इ. 11 वी चे वर्ग सुरु करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साळवेताई तसेच पालक यांनी निवेदन दिले. त्यानुसार मुख्याध्यापक मोरे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विद्यार्थ्यांना इ. 10 वी च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करून कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आभार दुसंग यांनी मानले.