Breaking News

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातअपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर,अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.