Breaking News

महिला बालकल्याण समिती सभापती सहीत 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल

शहरातील नालेगाव भागात 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारीच्या घटने संदर्भात पोलिसांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता मुदगल यांच्यासहीत अनेक जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. या मारहाणीत मानेवर प्राणघातक वार झाल्याने गंभीर जखमी झालेले अॅड.गजेंद्र दांगट यांना अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दांगट गटाचे अजय वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी महिला बालकल्याण समिती सभापती सुनिता मुदगल,त्यांचे पती तथा माजी नगरसेवक दत्ता मुदगल,माजी नगरसेविका मथुरा मुदगल,बाबासाहब मुदगल,भीमराव मुदगल,देविदास मुदगल,सर्वार्थ मुदगल,सचिन मुदगल,संगीता मुदगल,भाऊ मुदगल,महेश मुदगल व अन्य 2 लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मुदगल गटाचे भीम मुदगल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अॅड.गजेंद्र दांगट,अजय वाडेकर,अमोल वाडेकर,विजय बुगे,बाबू रोहोकले,गौरव दांगट आदिंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीच्या वेळी तलवारी, लोखंडी रॉड,लाकडी दांडके आदिं हत्यारांचा सर्रास वापर करण्यात आल्याने बराच काळ नालेगाव परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी तातडीने कारवाई करीत अमर मुदगल,सचिन मुदगल,देविदास मुदगल,बाबासाहब मुदगल,विजय बुगे,अजय वाडेकर व अमोल वाडेकर या 7 जणांना अटक केली असून न्यायालयाने सर्वांना 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.