मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातवर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शनिवारी दुपारी 1 वाजता समुद्राला मोठी भरती आली. ही भरती मोसमातील सर्वात मोठी भरती होती. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गेल्या शुक्रवारपासून संततधार पावसामुळे मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह कोकणातही पावासाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्याला समुद्री उधाणाचा मोठा फटका बसला आहे. तळाशील आणि आचरा येथील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. उधाण असेच राहिल्यास पाणी वस्तीत घुसण्याची भीती आहे. समुद्र आणि घरांमध्ये काही मीटर अंतर राहिल्याने आचरा भागात अनेक घरांना धोका बसण्याची शक्यता आहे.