Breaking News

रस्ता लुटीच्या तयारीतील पाच जण गजाआड





राहुरी / विशेष प्रतिनिधी 
राहुरी-नगर-मनमाड राज्य महामार्गावरिल शनि-शिंगणापुर फाट्याजवळ, रात्री दरोडा टाकण्याच्या तयारित असलेल्या पाच जणांच्या जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या, तर दोन जण अंधाराचा फायदा घेत चारचाकी वाहनातुन पसार झाले असुन, राहुरी पोलिसात गुन्हा रजि. नंबर 393।2018 भा दं वी कलम 399/402 आर्म अ‍ॅक्ट 4।25 प्रमाणे पोलिस नाईक मनोज सिताराम गोसावी यांनी फीर्याद दिली. नगर-मनमाड रोडवरील शनि शिंगणापुर फाट्याजवळ काल रात्री साडेदहा वाजेदरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारित असलेले, सादिक शेख, रा. लक्ष्मीनगर तालुका नेवासा, संतोश कांबळे, रा. वार्ड नं.2 श्रीरामपुर साबीर सय्यद, रा. बिफ मार्केट वार्ड नं.2 श्रीरामपुर, अन्वर मन्सुर, रा. बजरंग चौक वार्ड नं.2, सागर कांबळे, रा. रामनगर वार्ड नं.2 श्रीरामपुर, एकनाथ सोनवने, रा. बाबरपुर वार्ड नं.2 श्रीरामपुर व बबलु शहा,रा. वारूड नं.2 श्रीरामपुर हे दरोड्याच्या तयारित असताना पाच जणांना रंगेहात पकडले तर, सोनवने व शहा या दोघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाले. वरिल पकडलेल्या आरोपीकडुन हिरोहोंडा कंपनीची डिलक्स मॉडेलची दुचाकी क्र. एम.एच 17 बी.क्यु 5170, वेगवेगळ्या कंपनीचे पाच मोबाईल सत्तुर, लोखंडी धातुचा कोयता, लाकडी दांडके, मीरची पुडी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच पसार झालेल्या दोघांनी इंडिका कार क्रमांक एम.एच 04 सी.एम 5435 हिच्यामधुन फरार झाले असुन, यांचा शोध पोलिस घेत आहे.सदर कारवाई जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हिंगोले, पोहेकॉ मन्सुर सय्यद, पो.हे.कॉ योगेश गोसावी, पो.हे.कॉ बाळासाहेब भोपळे, चालक संभाजी कोतकर, पो.ना रविंद्र कर्डिले, पो.ना मनोज गोसावी, संतोश लोंढे, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे यांनी कामगिरी केली. घटनेचा तपास राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लक्ष्मण भोसले करत आहेत.

या गुन्ह्यातील सादिक शेख हा नेवासा येथिल अ‍ॅड. रियाज पठाण खुन प्रकरणातील आरोपी आहे. गुन्हा घडल्यापासुन आरोपी फरार होता, सदर घटना पाच वर्षापुर्वी घडली होती. तेंव्हापासुन हा फरार होता. सदर कारवाई एलसीबी पथकाने केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडुन मिळाली आहे.