Breaking News

जीएसटी संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली, दि. 30 - 17 वर्षापासून ज्याची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे त्या जीएसटी विधेयकाला बुधवारी अखेरीस मूर्त स्वरूप आलं. लोकसभेमध्ये जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स)शी संबंधित चार महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाली आहे. जीएसटी संदर्भात विधेयकांना लोकसभेत हिरवा कंदील मिळाल्यामुळे बुधवारचा दिवस ऐतिहासिक मानला जात आहे.
सात तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेत या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे ‘एक देश एक कर’ याकडे भारताची वाटचाल सुरु झाली आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर जीएसटी कायद्यात रुपांतरित होईल. जीएसटी लागू झाल्यानं ज्या राज्यांचा तोटा होणार आहे त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.