जगन्नाथ रथयात्रोत्सवाला भाविकांचा उत्साह
हैदराबाद - 141 व्या रथ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो लोक शनिवारी ओडिशातील पुरी येथे दाखल झाले आहेत. नऊ दिवसांचा वार्षिक जगन्नाथ रथयात्रोत्सव सुरु झाला. लाखो भाविक या भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांचे दर्शन घेतात आणि त्यांचे रथ खेचतात. भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा 21 जुलै रोजी गुंडीचा मंदिरात मुक्काम करणार आहेत. 22 जुलै रोजी बहुदा यात्रा म्हणजेच परतीच्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. या वर्षीच्या रथयात्रेसाठी 3.5 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात असलेल्या जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा या भावंडांच्या मूर्त्या मंदिराच्या बाहेर काढल्या जातात. मोठ्या लाकडी रथांमधून त्यांची मिरवणूक काढली जाते. हा वार्षिक उत्सव भगवान कृष्णाचा गोकुळ ते मथुरापर्यंत प्रवास साजरा करण्यासाठी केला जातो. हजारो भाविक ओढत असलेले तीन देवतांचे विशाल लाकडी रथ हा एक प्रेक्षणीय सोहळा असतो.