Breaking News

राजूरमध्ये फिरते पोलिस ठाण्याची सुरूवात


राजूर / वार्ताहर 
नागरिक आणि पोलीस यांच्यात सुसंवाद साधला जावा याकरिता, राजूर पोलीस ठाणे अंतर्गत फिरते मोबाईल ठाण्याची निर्मिती पोलिस अधिक्षक रंजनकुमार शमाृ यांचे संकल्पनेतून करण्यात येवून, स.पो. निरी. कादरी सहा.पो.
उप, निरी. पी. आर. निमसे, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, असे एकदरा(चंदगीरवाडी) या ठिकाणी जावून नागरीकांशी सुसंवाद साधला, चंदगीरवाडीचे सरपंच यशवंत बेंडकुळी यांनी फिरते पोलिस ठाण्याचे स्वागत केले. तसेच तसेच कामगार पोलिस पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ आवारी तसेच गावातील 20 ते 25 नागरिक उपस्थित होते. त्याठिकाणी शांतता कमिटी व सामाजिक सलोखा मिटिंग घेण्यात येवून स.पोलिस नि. कादरी यांनी फिरत्या पोलिस ठाण्याची संकल्पना विषद केली. नागरिकांनी देखील फिरते पोलिस ठाणेबाबत समाधान व्यक्त करून नागरिकांनी दिलेल्या मिहितीवरून अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाहीदेखील करण्यात आली