Breaking News

अंगणवाडी रंगकाम व डिजिटल लोकार्पण सोहळा


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे रविवारी 1 जुलै रोजी अंगणवाडी रंगकाम व डिजिटल लोकार्पण सोहळा व विविध कार्यक्रम पार पडले. फाऊंडेशन मार्फत जवळपास तीन लाखाची कामे करण्यात आली. त्याचप्रमाणे रविवारी गावातील अंगणवाडीचे जाणीव फाऊंडेशन मार्फत करण्यात आलेले रंगकाम व जिल्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी लोकार्पण सोहळा पार पडला. 
यावेळी वडनेरचे उद्योजक अर्जुन भालेकर यांनी अंगणवाडी साठी एल.ए.डी. आपल्या वडिलांच्या स्मरणप्रित्यर्थ भेट दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला जाणीव फाऊंडेशनचा अभिमान वाटतो. त्यांनी अल्पावधीतच गावातील मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात विविध कामे केली. ते करत असलेल्या कामांना मी यापुढेदेखील माझ्या परीने हातभार लावण्याचा प्रयत्न करील असे आश्‍वासन त्यांनी दिलेे. जाणीव फाऊंडेशनने यापुर्वीही जि.प. शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर फाऊंडेशनने अंगणवाडी डिजीटल करण्याचा उपक्रम हाती घेतल्यानंतर दोन महिन्यात लोकसहभाग व जाणीव फाऊंडेशनच्या सदस्यांनी स्वतः काही निधी जमवून, अंगणवाडीची रंगरंगोटीसह डिजीटल करून, त्यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच एक घर एक केशर संकल्पना जाणीव फाऊंडेशनने राबवली असून, पहिल्या टप्प्यात गावात 100 केशर आंब्याचे रोप 100 महिलांना देण्यात आले, त्याचप्रमाणे सन 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या वडनेरकरांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला. एम.पी.एस.सी परिक्षेमध्ये यश मिळविलेल्या वडनेरकरांचा गौरव करण्यात आला. 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांना पुस्तक देण्यात आले. जि.प. शाळा वडनेर हवेली बदली झालेल्या व नव्याने उपस्थित झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ, आदी कार्यक्रम पार पडले. हा कार्यक्रम सुरू असताना जाणीव फाऊंडेशन करत असलेल्या कामांसाठी 45 हजार रु. निधी जमा झाला. यावेळी उद्योजक अर्जुन भालेकर, आर.टी.ओ.पद्माकर भालेकर, पी.एस.आय. किरण भालेकर, बी.जी सालके, अंगणवाडी शिक्षिका शारदा दरेकर, राजेंद्र हारदे, रावसाहेब रेपाळे, अरुण बढे, सुधाकर भालेकर, लहू दरेकर, भाऊसाहेब भालेकर, लहू भालेकर, गणेश भालेकर, अनिल बढे, बबन कुटे, साहेबराव सोनूळे, जाणीव फाऊंडेशनचे आदिनाथ दरेकर, शशिकांत भालेकर, सुनील भालेकर, अमोल वाळूंज, नवनाथ बढे, गौरव भालेकर, स्वप्नील भालेकर , संदीप राऊत, निलेश बढे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण भालेकर यांनी प्रास्ताविक, तर 
सतिश भालेकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार सतिश भाऊसाहेब भालेकर यांनी मानले.