
मालवण तालुक्यात आचरा बाजारपेठेतील अरूण ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास सोमवारी रात्आग लागली. या आगीत दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून सुमारे पाच लाख तीस हजार रूपयांचे नुकसान झाले. आगीची घटना समजताच मदतीला धावून आलेल्या व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने संपूर्ण दुकान आगीपासून वाचून मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण समजू शकले नसले तरी आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत आचरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे आचरा बाजारपेठ येथील ढेकणे यांच्या लक्ष्मी क्लॉथ स्टोअर्स या कापड दुकानास आग लागली असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या गांवकर नामक इसमाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने लगत राहणाऱ्या कोदे,पाटकर यांना याची माहिती दिली. विदयुत मंडळ कर्मचारी पिंट्या साळकर यांना बोलावून विद्युत पुरवठा खंडित केला गेला. कपड्यांनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. पण सर्वांनी प्रसंगावधान दाखवत आग विझविल्याने केवळ दुकानाच्या एका भागात ठेवलेले कपडे जळून गेले. यात ब्लॅंकेट,चटई, लहान मुलांच्या गाद्या,बॅग्स,साड्या यांसह रेडिमेड कपडे जळून सुमारे चार लाख पन्नास हजार रूपयांचे कपडे जळून गेले तर इमारतीचे सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले.सकाळी घटना समजताच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढेकणे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच पोलीस तक्रार देण्यास सहकार्य केले पोलीस कर्मचारी चव्हाण, कैलास ढोले, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.