सिद्धटेकमध्ये दिंड्यांचे स्वागत
सिद्धटेक परिसरातील भांबोरा जलालपूर, बारडगाव, गणेशवाडी या गावांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्या दिंड्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. दौंड-श्रीगोंदा,राशीन या मार्गाने 40 वर्षांपासून दिंड्या याच मार्गाने पंढरपूरला जात आहेत. पायी दिंड्यांमध्ये वारकर्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. या मार्गावरील प्रत्येक दिंड्यांसाठी ठरलेल्या ठिकाणी चहा नाश्ता, जेवण आणि मुक्काम असा ठरलेला असतो. त्या त्या ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन केलेले दिसून येते. या वारकर्यांसाठी काही गावांमध्ये ग्रामस्थ, तरूण मंडळ, ग्रामपंचायतीमार्फत सेवा केली जाते. वारकर्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कर्जत आरोग्य उपकेंद्रामार्फत एक आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. ते दिंड्यांच्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा देतात.