३५० लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण : गांधी
राहुरी तालुका प्रतिनिधी
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ३५० लाभार्थ्यांना नगरसेवक सुर्वेन्द्र गांधी यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. वडार समाज जिल्हा अध्यक्ष दिनेश कुसमुडे व श्रीसंत सावता माळीचे तालुका अध्यक्ष अशोक तुपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वांबोरीतील माहेश्वरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील होते. याप्रसंगी सिध्देश्वरी गॅसचे किशोर शिंदे, उदय मुथा, दिपक साखरे, टायगर ग्रुपचे मुकेश पटेकर, नितीन कुसमुडे, भीमशक्तिचे युसुफ देशमुख, दिपक पुंड, अशोक तुपे, सतिष शेजवळ, अनिल कुसमुडे, भरत सत्रे, विष्णु पंडीत, शेखर दुधाडे, मनोज लोखंडे आदी उपस्थित होते.