Breaking News

समर्थ सत्संग परिवाराच्या आरोग्य शिबिरास प्रतिसाद


अहमदनगर प्रतिनिधी

येथील गुलमोहोररस्त्यालगतच्या विठ्ठल मंदिरात समर्थ सत्संग परिवारातर्फे आषाढी वारी आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास स्त्री आणि पुरूष भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरार्थींची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधेही देण्यात आली. समर्थ सत्संग परिवाराचे अध्यक्ष मंदारबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. 

श्री समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमेचे व मंदिरातील विठ्ठल- रक्मिणीचे पूजन करून या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. समर्थ सत्संग परिवाराच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा थोरवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आषाढी वारीस निघतांना आरोग्य तपासणी शिबिराची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन समर्थ सत्संग परिवाराने सद्भावनेनेतून हा उपक्रम सामाजिक हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याविषयी व्याख्यान देण्यास उपस्थित असलेल्या डाॅ. शिरीष साठे व डाॅ. अनिल गुंड यांना समर्थ सत्संग परिवाराचे अध्यक्ष मंदारबुवा रामदासी व सदस्य डाॅ. अनिकेत घोटणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री हर्षद भावे, मिलिंद चवंडके, सुनिल निंबाळकर, नामदेव जाधवर, संभाजी खेंगरे, गुजराथी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत वाटचाल करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी भाविकांनी विठ्ठलाचा उच्च स्वरात जयघोष करून समर्थ सत्संग परिवाराचा निरोप घेतला.