Breaking News

मुला-मुलींची ‘ती’ शपथ अंजन घालणारी : वाघ


अकोले प्रतिनिधी
समाजात मुला-मुलींच्या लग्नात हुंडा, मानपान ही प्रथा बंद होणे आवश्यक आहे. मात्र काही लोक हुंडा घेणे ही प्रतिष्टा समजतात. आज श्री समर्थ विधाल्यात मुलामुलींनी हुंडा घेणार नाही देणार, ही शपथ घेऊन समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे, असे प्रतिपादन अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.

येथील श्री समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विधाल्यात गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके व गणवेश वाटपप्रसंगी ते बोलत होते. राहुरीच्या युगंधर महिला संघटनेने यासाठी पुढाकार घेतला. यावेळी तैलिक समाजाच्या जिल्हा महिलाध्यक्षा विधा करपे आणि संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी वाघ उपस्थित होते. राहुरी येथून भंडारदरा निसर्ग पाहण्यासाठी जात असताना समाजाचे काही देणे लागतो, ही भावना उराशी बाळगून युगंधर महिला संघटनेच्या सदस्यांनी निधी जमवून त्याचे शालेय साहित्य खरेदी केले आणि ते गरीब मुलांना वाटप केले. यावेळी महिला, पालक, विधार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा सत्कार करतानाच त्यांच्यासोबत आलेल्या पूर्वा या छोट्या पाहुणीचाही शाळेतील अपूर्वच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. प्राचार्या एम. एस. काळे यांनी प्रास्तविक केले. यावेळी संस्थेचे सचिव एस. एल. काळे यांनी आभार मानले.