मॉल्स, चित्रपटगृहे 24 तास सुरु राहणार
नवी दिल्ली, दि. 29 - केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याने आता देशभरातील हॉटेल्स, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, दुकाने आणि स्थानिक बाजारपेठा चोवीस तास सुरु राहणार आहेत. या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणा-या मुंबईकरांना आता नाईट लाइफचा अनुभव घेता येईल.
मॉल्स, चित्रपटगृहे 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी देणा-या ‘मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स’ (दुकाने आणि आस्थापना) कायद्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे आता जेथे किमान 10 कर्मचारी कार्यरत आहेत अशा संस्था/ठिकाणांना 365 दिवस सुरु राहण्याचे तसेच सुरु/बंद होण्याच्या वेळांचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शिवाय, कायद्याने महिलांनादेखील अशा संस्थांमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे.
यासाठी संबंधित कंपनीला रात्रपाळीत काम करणा-या महिलांना पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह कॅन्टीन, प्राथमिक उपचारांचे साहित्य, स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्यासारख्या प्राथमिक सुविधा पुरविणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, 24 तास सुरु राहणा-या ठिकाणांवर आता अधिक मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.
कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, केंद्र सरकारने मंजुरी दिलेला हा कायदा राज्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना आपल्या सोयीप्रमाणे त्यात बदल आणि सुधारणाही करता येणार आहेत.