एटीएम लूट करणा-या विदेशी दाम्पत्याला अटक
मुंबई, दि. 29, डिसेंबर - मुलुंडमध्ये एका विदेशी दाम्पत्याने एटीएममधून एटीएमचा डेटा चोरून मुंबईतल्या 100 हून अधिक जणांना फसविल्याची घटना घडली. या नागरिकाना मुलुंडच्या नवघर पोलिसांनी नवी दिल्लीतून अटक केली आहे. एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा 100 पेक्षा जास्त असल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले होते. या दाम्पत्याने मुलुंड येथील एटीएममध्ये सीसीटीव्ही लावून पासवर्ड हॅक केले होते. त्या आधारावर त्यांनी जवळपास 20 लाखांहून अधिक रक्कम काढली होती. ही रक्कम रात्री 11.59 ते 1 वाजताच्या दरम्यान काढण्यात येत होती.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे समजताच अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचे तपास पथक नवी दिल्लीला रवाना झाले होते. मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे.