जिजामाता स्कुलच्या शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी टेकणे, मिसाळ उपाध्यक्ष
भेंडा ( प्रतिनिधी ) - येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये पालक शिक्षक संघाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण नवले होते. सभेत सन 2018-19 च्या शिक्षक पालक संघाच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी _प्राचार्य दिनकर टेकणे, उपाध्यक्षपदी संजय मिसाळ यांची तर सचिवपदी संदीप घोलप, सहसचिव सविता देशमुख व राणी स्वामी यांची निवड करण्यात आली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये डिजिटल वर्गखोल्या, उष्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी दिले जाणारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे विद्यालयाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. सलग तिन ते चार बँचेसची 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त करुन पुढील वर्षी ज्युनिअर कॉलेज सूरु करावे. अशी एकमुखी मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत जालिंदर आरगडे, विजय गोरे, बबन कोलते, निता मुनोत, रेखा वंजारी, योगिनी म्हस्के, मीना कचरे, उषा लष्करे, प्रियांका सोनार या पालकांनी भाग घेतला. रामकृष्ण नवले, साहित्यिक भाऊसाहेब सावंत, पत्रकार कारभारी गरड यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य दीपक राऊत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्राचार्य दिनकरराव टेकणे, संभाजी आगळे, बाबासाहेब म्हस्के ,वैभव नवले शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणी स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.तर योगिता शेजूळ यांनी आभार मानले.