Breaking News

दूध आंदोलनात पोलिस प्रशासनाचा दबाव नको : लांबे


राहुरी प्रतिनिधी 

राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारपासून [दि. १६] शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या दूध बंद आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये. या आंदोलनात शेतकरी बांधवांवर पोलिसांचा दबाव नको, अशी मागणी देवेंद्र लांबे यांनी केली आहे. 

यासंदर्भाचे अखिल भारतीय छावा संघटना, मराठा एकीकरण समितीचावतीने निवेदन देण्यात आले. रविवारी [दि. १५.] रात्री बारा वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुधाला प्रति लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांच्या साथीने दुध बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील शेतकरी काल रविवारी [दि.१५] रात्री शिर्डी येथे साईबाबांच्या भूमीत दुधाचा अभिषेक घालून शांततेच्या मार्गाने दूध आंदोलनास सुरुवात करण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना शिर्डी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात स्थानबध्द करून ठेवले आहे. पोलिस प्रशासनाने वेळीच निवेदनाची दखल घेऊन गुन्हे दखल करण्याचे सत्र न थांबविल्यास अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना रस्त्यावर उतरून आपल्या ‘छावा’स्टाईल ने दुध आंदोलनात उतरणार होणाऱ्या सर्व आंदोलनांची जबाबदारी महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासनाची असेल याची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.