Breaking News

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ


मिरजगाव / प्रतिनिधी 
येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट बँक मिरजगाव शाखेच्या वतीने व बँकेचे संस्थापक कडूभाऊ काळे यांच्या प्रेरणेने दरवर्षी प्रमाणे, याही वर्षी इयत्ता10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून, उज्वल यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व त्यांनी मिळवलेल्या गुणवत्ता यशाचे कौतुक सोहळा आयोजित कऱण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सूर्यवंशी म्हणून उपस्थित होते, त्याचबरोबर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले की, हा केवळ सत्कार नसून त्यांच्या उज्वल भावी वाटचालीस शुभेच्छा देत आहोत. या विद्यार्थ्यांचे सत्कार पाहून इतर विद्यार्थ्यांना त्यांची प्रेरणा घेत, याहीपेक्षा मोठे यश त्यांनी संपादन करावे.अशा कौतुकास्पद कार्यक्रमामुळे इतर विद्यार्थांना यामधून नवी प्रेरणा मिळते व ही प्रेरणा देण्याचं काम श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट मिरजगाव बँक प्रत्येक वर्षी करत आहे.
गुणवंत विदयार्थ्यांचा गुण गौरव कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाखाधिकारी अमोल तुपे, प्रसाद शिंदे व संभाजी लांडे यांनी परिश्रम घेतले.