Breaking News

वृक्षदिंडीतून दिला पर्यावरणाचा संदेश


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द येथिल श्री बाळानंद स्वामी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने बुधवारी वृक्ष दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या झाडांचे रोपे हातात घेवून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवाच्या जयघोषाने परिसर दणानून सोडला. 
दिंडी विद्यालयासमोर आल्यानंतर विद्यालय परिसर व दत्त मंदीर परिसरात सुमारे 300 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मगर म्हणाले की, यापुर्वी दत्त मंदिर परिसरात व स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले असून, परिसर हिरवाईने नटला आहे.विद्यालयाच्यावतीने वृक्षारोपन करण्यात आले असून, प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड संगोपनासाठी दत्तक घेतले आहे. यावेळी सरपंच संदीप मगर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सेवक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.