Breaking News

जामखेडला पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती सा. कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या तक्रारीची दखल

जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शासनामार्फत पशुवैद्यकीय विभागाची निर्मिती करण्यात आली. मात्र जामखेड येथे पशुवैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) उपलब्ध नसल्याने काही निष्पाप प्राण्यांना आपल्या जीवास मुकावे लागले. याबाबत दैनिक लोकमंथनने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शासनाने पशुवैद्यकीय अधिकारी जामखेडला उपस्थित झाले. दखल घेऊन बुधवारी पशुवैधकीय अधिकारी बाळकृष्ण शेळके यांची जामखेड येथे नियुक्ती करण्यात आली. 

डॉक्टरच उपस्थित नसल्याकारणाने जनावरांचे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हाल होतात. जनावरांना उपचारासाठी नगरला पाठविण्यात येत असल्याने, शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान व तसेच जनावरांचे ही हाल होत होते.
शेतकरी जोडधंदा म्हणून बकर्‍या, गायी, म्हशी, शेती कामासाठी बैलजोडी पाळतात. मात्र वैद्यकीय विभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या आरोग्याची हमी नव्हती. याबाबत जामखेड तालुक्यात रिक्त जागेवर पशूधन विकास अधिकारी तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुनील तुंभारे यांचेकडे केली होती. 

जनावरांच्या आरोग्याची काळजी घेवून तात्काळ त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. तसेच पशुसंवर्धनाबद्दलच्या योजना व जनावरांच्या दिल्या जाणारे लसीकरण कार्यक्रम घेण्याचा मानस आहे व तालुक्यात ते प्रभावीपणे राबवू.
- बाळकृष्ण शेळके (पशुवैद्यकीय अधिकारी जामखेड)