Breaking News

राजीव गांधी विद्यालयात गुणवंत गौरव, पालक मेळावा

धामणगांव आवारी / वार्ताहर । अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथिल भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाचे वतीने हनुमान मंदिर सभागृहात शनिवारी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी इयत्ता दहावी परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले संकेत आवारी, प्रज्ञा पोखरकर, प्रेरणा आवारी या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, सदस्य बाळासाहेब भोर, स्थानिक स्कूल कमेटीचे अध्यक्ष आरीफ तांबोळी यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे होते.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब आवारी, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश आवारी, चिमण आवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच किसन आवारी, सदस्य राधाकिसन पोखरकर, विजय आवारी, अशोक देशमुख, दिनकर आवारी, नवनाथ भोर, दगडू तळेकर, पूजा आवारी, अशोक देशमुख, विजय आवारी, महेंद्र आवारी, सोसायटीचे चेअरमण भाऊ आवारी, विश्‍वनाथ महाडदेव, अरुण पोखरकर, मच्छिंद्र पोखरकर, अशोक आवारी, इंदुबाई मेंगाळ, एकनाथ पापळ आदिंसह पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.व्ही कोटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डि.के. जेडगुले, व्हि.पी. आवारी, एस.एल. नरोडे, व्हि.पी सोनवणे, शिक्षक-शिक्षेकेतर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार व्हि.पी आवारी यांनी मानले.