धामणगांव आवारी विद्यालयाचे वतीने वृक्षारोपण
धामणगाव आवारी / वार्ताहर
अकोले तालुक्यातील धामणागाव आवारी येथे भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाचे वतीने विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयाचे वतीने शासनाचे सन 2018-2019 चे 13 कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सचिव यशवंत आभाळे, सदस्य बाळासाहेब भोर, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष आरिफ तांबोळी, यांचे हस्ते व सरपंच किसन आवारी, पुजा आवारी, चिमण आवारी, बाळासाहेब आवारी राधाकिसन पोखरकर, अशोक देशमुख, एकनाथ पापळ, भाऊ आवारी, व गावातील पालक, ग्रामस्थांचे उपस्थितीत विद्यालय परिसरात, कडूनिंब, आवळा, आंबा, अशोका याचबरोबर विविध जातीचे फळ व शोभेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डि.के. जेडगुले, व्हि.पी. आवारी, एन.व्ही कोटकर, एस.एल नरोडे, व्हि.पी सोनवणे, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी, यांनी विशेष परिश्रम घेतले.
