संजय गांधी निराधार योजनेची 241 प्रकरणे मंजूर
कुळधरण : प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेची बैठक कर्जतच्या तहसील कार्यालयात संपन्न झाली.कमिटीचे अध्यक्ष धनराज कोपनर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
तहसीलदार किरण सावंत, समितीचे सदस्य अशोक जायभाय, सुनील गावडे, विश्वास डमरे, नागनाथ जाधव, बापुराव ढवळे, बाबा डोंबळे, व्ही.डी. शेजोळे, व्ही.एस. सामलेटी आदींच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. योजनेच्या लाभासाठी तालुक्यातील 312 प्रकरणे मंजुरीस ठेवण्यात आली. बैठकीत चर्चा व पडताळणी करुन त्यातील 241 प्रकरणे निकाली काढण्यात आली अशी माहिती धनराज कोपनर यांनी दिली. यावेळी अनेक लाभार्थी उपस्थित होते. अशोक जायभाय यांनी आभार मानले.
