Breaking News

शरद पवारांकडून वसंतदादा पाटलांच्या आठवणींना उजाळा

मुंबई, दि. 02 - 1972 साली वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात शरद पवार आणि वसंतदादा दोघेही मंत्री होते. पवारांनी या काळातल्या अनेक किश्श्यांना उजाळा दिला. निमित्त होतं वसंतदादा पाटील यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं.
पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची आज 28 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं ‘आम्ही सांगलीकर’ या संस्थेनं मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. प्रत्येकानंच दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
1972 साली आम्ही दोघे वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात मंत्री झालो होतो. त्यानंतर शंकरराव चव्हाण आणि स्वतः वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत काम केले. शिक्षण कमी असले तरी अधिकार्‍यांसोबत जास्तीत जास्त वेळ देऊन एखादा विषय समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे. साखर कारखाने, सूत गिरणी, डेअरी अशा अनेक संस्थांची उभारणी वसंतदादा यांनी केली. असे शरद पवार यांनी सांगितले.