Breaking News

समाजपयोगी संशोधनावर भर हवा : डॉ. कोकरे: ‘अमृतवाहिनी’मध्ये कार्यशाळा उत्साहात


संगमनेर प्रतिनिधी

अनुसरण करुन संशोधन करण्यापेक्षा नाविण्यपूर्ण आणि समाजोपयोगी संशोधनावर भर देण्यात यायला हवा , असे आवाहन एस. जी. जी. एस. नांदेड येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. मनेश कोकरे यांनी केले.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभाग व इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडिया (आयईआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्टिमिडिया - व्याप्ती आणि उपयोजन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, अधिष्ठाता डॉ. एम. आर. वाकचौरे, रजिष्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, आय.टी. विभाग प्रमुख डॉ. बायसा गुंजाळ आदींसह सर्व विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अनिल शिंदे यांनी केला. यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी मुलांना मार्गदर्शन केले. आय. टी. विभागाच्या प्रगतीचा आढावा डॉ. बायसा गुंजाळ यांनी मांडला. आयईआयतर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे विश्‍लेषण समन्वयक प्रा. आर. एस. भोसले यांनी केले. आय.टी. विभागाच्यावतीने प्रत्येक सत्रात प्रकाशित होणार्‍या ‘अन्वेष’ या मासिकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या मासिकाचे संपादन व रचना प्रा. सुदीप हासे यांनी केले आहे.

आय. आय. टी. खरकपूर येथून पी. एच. डी. प्राप्त झाल्यानंतर डॉ. एम.बी. कोकरे यांनी पोस्ट डॉक्टरेट पदवी कॅलिफोर्निया सेन्ट बार्बरा विद्यापीठ, अमेरिका येथून प्राप्त केली. मानवी ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून संशोधन कशा प्रकारे केले जाऊ शकते, याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. मजकूर, चित्रफित, दूरचित्रवाणी आदींच्या माध्यमातून संपर्क कसा प्रस्थापित होतो, कसा साठवला जातो आणि त्याची सुरक्षा कशी नियंत्रणात आणली जाऊ शकते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रकाशने, मेडिकल सुविधा, वाहतूक यंत्रणा, रोबोट, दूरचे ऑनलाईन शिक्षण किंवा कॉन्फरन्स, खेळ, करमणूक, व्हर्च्यूअल रिअ‍ॅलिटी आदी विभागांतील उदाहरणांसहित भविष्यातील संशोधनाविषयीच्या शक्यता डॉ. एस. बी. कोकरे यांनी स्पष्ट केल्या.

वाहतूक आणि गुन्हेगारी या विभागातील संशोधन त्यांनी विस्तृत प्रकारे समजावून सांगितले. या कार्यशाळेसाठी आयईआय चे समन्वयक प्रा. राजकुमार भोसले यांनी विशेष प्रयत्न घेतले. सूत्रसंचलन प्रा. सुदीप हासे यांनी केले. प्रश्‍नोत्तरांच्या सत्रानंतर कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख यांनी आय. टी. विभागाचे विशेष कौतूक केले.