Breaking News

वनविभागामार्फत नान्नजमध्ये वृक्ष लागवड


जामखेड / ता. प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रम 50 कोटी वृक्ष लागवड वनमहोत्सव सन 2018 /2019 या वर्षात तेरा कोटी वृक्ष लागवड शासन मोहीम अंतर्गत जामखेड तालुक्यातील नान्नज येथे वनविभागाच्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात आली. 
31 जुलै या शासन निर्णय घोषित वृक्ष लागवड मास अंतर्गत महाराष्ट्रातील गाव, वाडी, वस्ती येथे फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात असतानाच, जामखेड तालुक्यातील नान्नज गावच्या पश्‍चिमेस असणार्‍या वनविभागाच्या शेकडो एकर जमिनीमध्ये उंच सकल भागात खड्डे घेऊन माती भरन करून, वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षक, नान्नज गावच्या संरपच विद्या मोहळकर, डॉ. सर्जेराव मोहळकर, ग्रा. सदस्य सचिन मलंगणेर, शिवाजी मोहळकर, नंदादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक जवरे, भाजपचे युवा नेते जालिंदर चव्हाण, नितीन मोहळकर, आदम शेख, संदिप सोनवणे, फारूक शेख, शंभु किंबहुणे, राजु साळवे यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वनखात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी छबीलवाड, वनपरिमंडळ अधिकारी खराडे, वनरक्षक किशोर गांगर्डे, विष्णु राठोड, माया देशभ्रतार, वनमजूर सुरवसे गवळीसह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व पंचक्रोशीतील वृक्षप्रेमी नागरिक तसेच प्रमुख अतिथी म्हणून, जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वन अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने वृक्षाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर व शालेय विद्यार्थी यांच्यावतीने नियोजित वनविभागाने तयार केलेल्या, खेड्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वन अधिकारी यांनी अधिक माहिती दिली तर, सभापती सुभाष आव्हाड यांनी वृक्ष लागवडीची गरज व महत्त्व सांगितले, या कार्यक्रमाचे आभार खराडे यांनी मानले.