Breaking News

वनक्षेत्र वाढविण्याची गरज : खरात


देवगाव : पर्यावरण संतुलनासाठी वनक्षेत्र ३० टक्क्यांवर नेण्याची गरज आहे. हे काम विद्यार्थीच करू शकतात. या बाबीकडे सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिले जाणे आवश्यक आहे. मात्र लोक सामाजिक बांधिलकी जपत नसल्याची खंत आदिवासी सेवक बाबा खरात यांनी व्यक्त केली. राजूर येथील श्र समर्थ विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी वृक्षदिंडी काढण्यात आली. वनक्षेत्रपाल दिलीप जाधव, श्रीराम पन्हाळे, सुमंत वैद्य, चंद्रकांत जाधव आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य मंजुषा काळे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले.