Breaking News

जीवघेणे झाड काढण्याची मागणी


जामखेड
नागरिकांसाठी जीवघेणे ठरणार्‍या जामखेड न्यायालयााच्या मागील बाजूस असलेले जीर्ण आणि जीवीतास तसेच इतर गोष्टींसाठी धोकादायक ठरणारे वडाचे झाड काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री राम शिंदे यांचेकडे केली आहे. 
सदरचे झाडाचे वयोमान अधिक झाल्याने ते वादळी वार्‍यामुळे तसेच पावसामुळे पडण्याची दाट शक्यता दिसून येत असल्याकारणाने, काही अनर्थ होण्यापुर्वीच हे झाड हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.