Breaking News

माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बचावले

नगर, दि. 30- नगर - पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणार्‍या फोर्ड गाडीने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून या गाडीमध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह तीघेजण बालंबाल बचावले आहे. कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर काही काळ थांबून पाचपुते ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर्ड इंडिव्हर या चारचाकी वाहनाने पुण्याला चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक योगेश भोसले चालक युवराज उबाळे हे होते. साधारणत: रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी नगर पुणे रस्त्यावरील सरदवाडीजवळील पीर फाट्यानजीक आली असता. रस्त्यात एका ट्रकचा बिघाड झाल्यामुळे ती ट्रक रस्त्यातच उभी होती. अंधारात रस्त्यात मध्येच ट्रक उभी होती. त्या ट्रकला कुठलीही पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पाचपुते यांच्या चालकाला ट्रक उभी असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाचपुते यांची गाडी ड्रायव्हर साईडने ट्रकच्या मागील बाजूस जाऊन आदळली. परंतु त्याचवेळेस पाचपुते यांच्या गाडीचे एअर बॅग उघडल्यामुळे गाडीतील कुणालाच दुखापत झाली नाही.चालकासह सर्वजण सुखरूप आहेत. या अपघातानंतर माजी मंत्री पाचपुते एका खासगी वाहनाने पुण्याला गेले. दरम्यान, अपघात ऐवढा भिषण होता की यामध्ये पाचपुते यांच्या गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचुर झाला आहे. अपघात भिषण असला तरी यामध्ये सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.