Breaking News

अकोल्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्यात आली आढावा बैठक


मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन नागपूर येथे अकोला जिल्हयाच्या विविध समस्या बाबत ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीच्या पुर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत मागेल त्याला शेततळे योजनेचा आढावा, जलयुक्त शिवार अभियान सन 2016-17 मधील कामांबाबत, धडक सिंचन विहीरी कार्यक्रमाचा आढावा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सन 2016-17 या वर्षातील कामांचा आढावा/सद्यस्थिती सन 2016-17 मधील अपुर्ण कामे, कृषि पंप जोडण्री सन 2016-17 प्रलंबित अर्जाचा आढावा, शबरी/रमाई/पंतप्रधान आवास योजनेचा आढावा, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंमलबजावणी बाबत, कवठा बॅरेज प्रकल्पाचे काम पुर्ण करणे, काटीपाटी बॅरेज प्रकल्प, उमा बॅरेज प्रकल्पाचे कंत्राटदाराने काम पुर्ण केले नाही. बार्शिटाकळी नगरपंचायत ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणेबाबत, जिल्हा स्त्री रूग्णालयातील खाटा 300 वरून 500 करणे बोरगांव मंजू ग्रामिण रुग्णालय बांधणे चौहोट्टा बाजार येथील ग्रामिण रूग्णालय बांधणे, नगर परिषद तेल्हारा पुरक पाणी पुरवठा योजना, अकोला येथे स्पिनिंग हब व टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत अहवाल सादर करण्याबाबत, घुंगशी प्रकल्पावरून मुर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करण्याबात , अकोट तालुकयातील 132 गावांची पाणी पुरवठा योजना प्रस्ताव , मोर्णा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण प्रलंबित प्रश्न, अकोट येथे 100 खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल बांधण्याबाबत, नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नविन इमारतीचे बांधकाम करणे तेल्हारा जि. अकोला येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे , अकोट जि. अकोला येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे अकोला तहसिल कार्यालयाचे बांधकाम करणे, अकोला शहरातील जुन्या बसस्थानकाची जागा अकोला महानगरपालिकेस उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करणेबाबत , सी.सी.टी.व्ही. खरेदी अनियमितबाबत चौकशी, पोलिस गृहनिर्माण आढावा घेण्यात आला.