२८ पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप
कुरखेड़ा पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमांत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार मांडवकर होते. याप्रसंगी स्थानांतरित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरानी आपल्या मार्गदर्शनातून ठाणेदार पडळकर यांनी घडवून आणलेल्या या उपक्रमाची प्रशंसा करीत स्थानांतरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या तर यावेळी स्थानांतरित पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
