श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय 250 वृक्षलागवड
नेवासा ( शहर प्रतिनिधी)
ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासा तालुक्यात राबविण्यात येणारा 75 हजार वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, कनिष्ठ उपप्रचार्य विजय डोळस, पर्यवेक्षक विश्वनाथ वाघमारे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुनील गर्जे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालय परिसरात एकूण 250 नारळ, आंबा व इतर वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी प्रा. दशरथ आयनार, प्रा. रामभाऊ दरवडे, प्रा. डॉ. यशवंत आहेर, रामभाऊ पवार, प्रा. दिगंबर कार्ले, प्रा. अजय पवार, प्रा. मयूर जामदार, प्रा. हरिश्चंद्र माने, प्रा. रवींद्र घोलप, प्रा. ज्ञानेश्वर पुराने, प्रा. संदीप तोगे, प्रा. सुजय नवले, प्रा. हरिश्चंद्र पंडित, प्रा. सुभाष सोनवणे, प्रा. मुकूंद खर्डे, प्रा. कंकर वडागळे, प्रा. राधा मोटे, प्रा. संगीता नवले, प्रा. मंदाकिनी थावरे, बाळासाहेब जपे, भाऊसाहेब चक्रनारायण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
