दखल प्रेमानं घेतला जवानाचा बळी!
प्रेम कधी कुणाच्या जीवावर कधी उठेल ते सांगता येत नाही. प्रेमातून खून होतात. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. प्रेमानं जग जिंकता येतं. असं म्हणतात; परंतु जग जिंकण्यापेक्षा कुटुंबं उद्ध्वस्त होण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रेम निभावता आलं नाही, तरी ते प्रेम जिवावर बेततं. प्रेम असे बळी घेताना तो जवान आहे, की दहशतवादी आहे; श्रीमंत आहे, की गरीब किंवा उच्च जातीचा आहे, की निम्न असा भेद कधीच करीत नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे सात जुलै 2016 रोजी हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुर्हाण वाणी लष्कराच्या झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तेव्हापासून काश्मीर खोरं धुमसतं आहे. त्यानं प्रेयसीला दगा दिला. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
....................................................................................................................................................
प्रेयसीनं त्याच्या ठिकाणाची माहिती लष्कराला दिली. आता नेमकं त्याच्या उलटं घडलं आहे. काश्मिरी युवतीशी केलेलं प्रेम एका लष्करी जवानाला भोवलं आहे. लष्करी जवानांसाठी लष्करानं काही नियम केलेले असतात. ते मोडले, की ते कसं जिवावर बेततं, याचं उदाहरण म्हणजे लष्करी जवान औरंगजेब याचं अपहरण आणि त्याची केलेली हत्या हे आहे. भारतीय सैन्यदलातील औरंगजेब या जवानाची मागील महिन्यात जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना औरंगजेबचं अपहरण करून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. एका स्थानिक मुलीबरोबर असलेली औरंगजेबची मैत्री आणि क ाही नियमांचं त्यानं केलेलं उंल्लघन यामुळं हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. औरंगजेबनं थोडी अधिक काळजी घेतली असती तर आज तो जिवंत असता. काश्मिरी युवकाला जीपला बांधून अन्य लोकांच्या हल्ल्यापासून संरक्षण करणार्या मेजरबद्दल उलटसुलट चर्चा झाली. त्याचंही असंच एका काश्मिरी युवतीला एका हा ॅटेलमध्ये भेटणं, हॉटेलचालकाला धमकावणं वादाचा विषय झालं आहे. आधीच काश्मिरी नागरिकांमध्ये लष्करी जवानांबद्दल राग असताना दुसरीकडं अशा घटना घडल्या, तर लष्कराविषयीचा राग आताच्या परिस्थितीत आगीत तेल ओतायला कारणीभूत ठरू शकतो.
राष्ट्रीय रायफल्सचा जवान म्हणून जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या औरंगजेबचं 14 जून रोजी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. आता हाती आलेल्या माहितीनुसार, ईदच्या सुट्टीनिमित्त पुंछ येथील घरी जाण्यासाठी औरंगजेबनं खासगी गाडी भाड्यानं घेतली होती. शोपिया इथं पोहचल्यावर त्यानं चालकाला उतरायला सांगितलं आणि त्यानं स्वत: गाडी चालवायला सुरुवात केली. काश्मीरच्या खोर्यातून खाली उतरून पुंछला जाण्याआधी त्याला एका स्थानिक महिलेला भेटायचं होतं. मात्र, काही अंतर जाताच दहशवाद्यांनी त्याची गाडी थांबवली. त्यांनी औरंगजेबला खेचून गाडीबाहेर काढून त्याला अज्ञात स्थळी घेऊन गेले. तिथंच व्हि डिओ शूटिंग करून त्याची हत्या केली. औरंगजेब मागील काही महिन्यापासून एका स्थानिक महिलेच्या संपर्कात होता. या महिलेच्या माध्यमातूनच दहशतवाद्यांनी औरंगजेबची माहिती मिळविली. यासाठी त्या महिलेवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळं औरंगजेब कोणत्या मार्गानं घरी जाणार आहे हे दहशतवाद्यांना ठावूक झालं. तो त्या महिलेला भेटण्यासाठी एकटाच आपल्या गाडीतून निघणार हे दहशवाद्यांना ठावूक होते. त्यावरून त्यांनी सापळा रचून त्याला पकडल्याचं समजतं. औरंगजेबच्या हत्येसंदर्भातील हा सर्व घटनाक्रम समोर आल्यानंतर आता लष्करानं जवानांसाठी नवीन नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये स्थानिक महिलांशी आणि मुलींशी मैत्री न करण्याचा सल्ला जवानांना देण्यात आला आहे. तसेच ऑन ड्युटी नसताना आजूबाजूच्या परिसरामध्ये भटकंती करताना लष्कराच्या कायद्यांचं आणि नियमांचं उल्लंघन करू नये, असा आदेश लष्करानं दिला आहे. भारतीय लष्कराबद्दल येथील स्थानिकांमध्ये कमी अधिक प्रमाणात द्वेषभावना असल्याचं अशा वातावरणात काम करणं खूपच कठीण असतं. याच कारणासाठी एखाद्या स्थानिक महिलेबरोबर मैत्री किंवा जवळीक करणं चुकीचं आणि धोकादायक असतं.
लष्कराच्या नियमानुसार खासगी गाड्यांनी प्रवास करण्याची जवानाना परवानगी नसते. काश्मीर खोर्यातून जाताना त्यांना बुलेट प्रूफ वाहनं दिली जातात. मात्र, औरंगजेबनं एका मुलीला भेटायचं असल्यानं खासगी गाडीनं जाण्याची चूक केली आणि तो प्राणाला मुकला. औरंगजेबनं बनीहालपर्यंत लष्काराच्या गाडीनं जाऊन तिथून पुढं त्यानं खासगी वाहनानं प्रवास केला असता तर त्याचा जीव वाचला असता. राष्ट्रीय रायफल्सचे जवान काश्मीर खोर्यामध्ये दहशवाद्यांचा खात्मा करणार्या तुकडीमध्ये असतात, म्हणून ही तुकडी कायमच दहशतवाद्यांच्या हीट लिस्टवर असते. औरंगजेब प्रकरणानंतर लष्करानं जारी केलेल्या सूचनांचं आणि आदेशांचं काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात काम करताना नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. थोडीशी जरी चूक झाली, तरी ती जिवावर तर बेततेच शिवाय लष्कराची प्रतिमा मलीन होऊन स्थानिक नागरिकांचा लष्कराविषयीचा असंतोष वाढत जातो. दहशतवाद्यांविरोधात लष्क री जवान जेव्हा कारवाई करतात, तेव्हा त्यांना स्थानिक जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं, तेव्हा अशी छोटी-मोठी अनेक कारणं कारणीभूत असतात. त्यामुळं प्रेम करताना संबंधित तरुणीचा दहशतवादी वापर तर करून घेणार नाहीत ना, याची काळजी घ्यावी लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कधीकधी प्रेमाचं सोंग करून लष्कराच्या हालचाली काढून घेऊन त्या दहशतवाद्यांपर्यंत ही पोचविल्या जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.