बुराडी आत्महत्या तांत्रिकामुळेच अज्ञात व्यक्तीने चिठ्ठी पाठवत केला दावा
न
वी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरात 11 जणांच्या आत्महत्या प्रकरणात रोज नव-नवीन खुलासे समोर येतांना दिसून आहे. यामुळे तपास अधिक ार्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या चिट्ठीमुळे या आत्महत्या अंधश्रद्धेतूनच झाल्याचा संशय आणखी बळावला आहे.
पोलीस आयुक्तांना उद्देशुन एका अज्ञात व्यक्तीने एक पत्र लिहिले आहे. या पत्रात या संपूर्ण प्रकरणात करालाच्या एका तांत्रिकाचा हात असल्याचा दावा क रण्यात आला आहे. ’मी भाटिया कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखतो. या कुटुंबाला अनेकदा मी तांत्रिकाकडे जाताना पाहिले आहे’ असा दावा पत्रात या अज्ञात व्यक्त ीने केला आहे. दरम्यान, अशी कोणतीही चिट्ठी मिळाली नसल्याचे क्राईम ब्रांचच्या अधिकार्याने म्हटले आहे. स्वत:ला देशाचा एक आदर्श नागरिक सांगत नाव गुप्त ठेवण्याची विनंती या पत्रात अज्ञाताने केली आहे. ’भाटिया कुटुंब करालाच्या एका तांत्रिकाकडे जायचे. हा तांत्रिक मंदिरामध्ये बसतो. त्याची पत्नीदेखील तंत्र-मंत्र करते. कोणालातरी जीवे मारण्यासाठी अथवा त्रास देण्यासाठी ही महिला पैसे घ्यायची’ असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. पत्र पाठवणारा व्यक्ती करालाचा रहिवासी आहे. हे पत्र लिहिण्याचा उद्देश करालाच्या तांत्रिक बीडी बाबाचे पितळ उघडे पाडणे आहे. यामुळे भाटिया कुटुंबाने आत्महत्या का केली याबाबतचे सत्यदेखील बाहेर येईल, असे या व्यक्तीने म्हटले आहे. राजधानी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरात 11 जणांचे मृतदेह आढळून आले होते. या सर्वांनी अंधश्रद्धेतून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.